विशाल कदम / सातारा :
साताऱ्याच्या राजघराण्यावर लेवे घराण्यांची निस्सिम श्रद्धा आणि निष्ठाही. लेवे घराण्यातील कर्तबगार महिला म्हणून मुक्ता वसंत लेवे यांच्याकडे मनोमिलनाच्या कार्यकाळात नगरसेविका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या माहेरी कोणताही राजकीय वारसा नव्हता. परंतु सासरी त्यांचे पती वसंत लेवे हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत एक सक्षमपणे मनोमिलनाच्या काळात नगराध्यक्षा म्हणून त्यांनी केलेल्या कामांचा ठसा आजही सातारकरांच्या मनात घर करुन राहिला आहे. त्यांनी त्या काळात केलेली कामे आज सातारकरांच्या मनात ठसा उमटवून ठेवलेली आहेत.
राजकारण हे सामान्य महिलेच काम नाही. परंतु सातारा तालुक्यातील आहिरेवाडी या गावी सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मुक्त लेवे यांचा राजकारणात प्रवेश त्यांचे पती विद्यमान नगरसेवक वसंत लेवे यांच्यामुळे आणि प्रभागातील नागरिकांच्या आग्रहामुळे मनोमिलनाच्या काळात झाला. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले असून शालेय जीवनात त्यांनी व्यासपीठावर कधी भाषण सुद्धा केले नव्हते. परंतु नगरसेविका म्हणून त्या काळात त्यांच्यावर वॉर्डातील नागरिकांनी सोपवलेली जबाबदारी ही त्यांनी लोकांची सेवा करण्याचे स्वीकारलेले वृत्त समजूनच त्यांनी कामास प्रारंभ केला. खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी नगराध्यक्षा म्हणून त्यांच्यावर दि. 22 डिसेंबर 2011 रोजी संधी दिली. साताऱ्याच्या त्या मनोमिलनाच्या काळातील महिला नगराध्यक्षा म्हणून त्या कुठेही कमी पडल्या नाहीत. त्यांनी त्या काळात सातारा विकास आघाडी असेल वा नगरविकास आघाडी असेल या दोन्ही आघाडय़ांतील नगरसेवकांच्या वॉर्डातील लक्षवेधी अशी कामे केली. त्यांच्या कार्यकाळात केलेली कामे आजही सातारकरांच्या आठवणी जाग्या करणाऱया आहेत. त्यापैकी सध्या जे कास धरण उंची वाढवण्याचे काम सुरु आहे ते त्यांच्याच कार्यकाळात करारनामा झाला अन् तेव्हापासून पाठपुरावा सुरु होता. आज जे वेगाने काम सुरु आहे ते त्या वेळच्या त्यांच्या पाठपुराव्यामुळे व त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळेच. तसेच सध्याचा जो कचरा डेपो आहे त्या कचरा डेपोला संरक्षण भिंत उभी करण्याचा महत्वकांक्षी निर्णयही त्यांच्याच कार्यकाळात झाला आहे.
स्वच्छ वॉर्ड संकल्पना राबवणाऱ्या एकमेव नगराध्यक्षा
एक महिला नगराध्यक्षा म्हणून मुक्ता लेवे यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांच्याकडे जे जे सातारकर प्रश्न घेवून जात होते. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या प्राधान्य देत होत्या. अभ्यासपूर्ण असा त्यांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला. संपूर्ण शहराबरोबरच त्यांच्या प्रभागाकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष होते. गटर, पाणी, लाईट या मुलभूत सुविधा तर त्यांनी दिल्याच परंतु नाविण्यपूर्ण योजना सातारकरांना कशा देता येतील याकरता त्यांनी प्राधान्य दिले गेले. त्यामुळे त्या आजही त्यांनी केलेल्या कामांचा ठसा सातारकरांच्या काळजात ठसा उमटवून राहिल्या आहेत.

स्वच्छ वॉर्ड संकल्पना अन् चिमणपुरा पेठ निर्मल
2011 ला स्वच्छ सुंदर शहर ही संकल्पना सुरु झाली होती. त्याच वेळी त्यांनी आपला परिसर, आपला वॉर्ड सुंदर ठेवावा ही संकल्पना त्यांनीच साताऱयात स्वतःच्या वॉर्डात राबवला अन् ती संकल्पना पूर्ण केली. चिमणपुरापेठेत त्यावेळी त्यांनी प्रत्येक घरासमोर स्वच्छता संदेश देणारे फलक लावले. पेठेत बाग केली. त्यांच्या पेठेतील कचराकुंडी हटवण्यात आली. असे नाविण्यपूर्ण त्यांनी उपक्रम राबवले गेले. तसेच हळदीकुंकू सोहळा त्याकाळी सुरु केलेला आजही त्या वॉर्डातल्या महिलांसाठी आर्वजून संक्रांतीच्या सणांला आयोजन करतात.
अण्णांचे मार्गदर्शन अन् साथही
नगरसेवक अण्णा लेवे हे अभ्यासू व्यक्तीमत्व. पालिकेच्या संहितेसह कोणत्या विभागात नेमकी काय कामे चालतात हे माहिती असल्याने त्यांनी नेहमीच त्याकाळी नगराध्यक्षा म्हणून काम करताना मुक्ता लेवे यांना मार्गदर्शन केले. पण त्या ज्यावेळी पालिकेत पदावर असताना अण्णा कधीही पालिकेत फिरकत नव्हते. दिलेली जबाबदारी त्यांनी एक नगराध्यक्षा म्हणून सौ. मुक्ता लेवे यांनी सक्षमपणे पेलली. आताही नगरसेवक अण्णा लेवे यांच्या पाठीशी त्या एक पत्नी म्हणून आणि पालिकेत नगराध्यक्षा म्हणून केलेल्या कामाच्या अनुभवामुळे भक्कमपणे उभ्या राहतात.
विकासकामांच्या जोरावर वॉर्डाचा कायापालट
नगरसेवक अण्णा लेवे यांच्याकडून वॉर्डात विकासकामांचा डोंगर उभा करण्याचे काम सुरु आहे. अण्णा लेवे यांनी जी जी वॉर्डात कामे केलेली आहेत. त्या कामांमागे त्यांच्या सौभाग्यवती सौ. मुक्ता वसंत लेवे यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच आज महादरे तलावापासून ते मंगळवार तळय़ापर्यंत आणि चिमणपुऱ्याच्या गारेच्या गणपतीपासून ते व्यकंटपुऱ्यातील कृष्णेश्वर मंदिरापर्यंतचे रस्ते असतील, गटर असतील, स्ट्रीट लाईट असतील आदी कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. त्यामुळे अण्णा लेवे हेच पुन्हा प्रभागातील नागरिकांच्यासाठी विरोधकांचे डिपॉझिट जप्त करायला लावण्याची रणनिती माजी नगराध्यक्षा मुक्ता लेवे यांच्या संकल्पनेतून पुन्हा येणार आहेत. सातारा विकास आघाडी फिरसे कहो अण्णा लेवे दिलसे असेच प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या तोंडी आजही वाक्य पहायला मिळते आहे.