बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील कोरोना रूग्णांना टपाल मतपत्रिकांचा वापर करून आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत मत देण्याची परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने (केएसईसी) गुरुवारी केली आहे.
राज्यातील ५८००ग्रामपंचायतींच्या निवडणूकीपूर्वी १० पानांच्या मानक कार्यप्रणाली (एसओपी) मध्ये, केएसईसीने कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना मतदानासाठी टपाल मतपत्रिका वापरता येतील यासाठी स्वतंत्र मार्गदर्श कतत्वे जारी केली जातील. घरी अलग असणाऱ्या किंवा रुग्णालयात राहून त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे.