ऑनलाईन टीम / मुंबई :
कांदिवली स्टेशनजवळ रेल्वे रुळावर ट्रक आल्याने जोराची धडक होऊन अपघात झाला. यामध्ये ट्रकची मागील बाजू रेल्वे मार्गावर आल्याने हा अपघात झाला. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे लाईनचे काम सुरू आहे. यासाठी ट्रकमधून आवश्यक ती मालवाहतूक केली जाते. मात्र आज दुपारी साडेबाराच्या सुमारास, आलेल्या रेल्वेने, या ट्रकला धडक दिली. या धडकेमुळे ट्रकच्या मागील बाजूचं नुकसान झालं आहे. शिवाय रेल्वेच्या धडकेमुळे ट्रक फरफटत गेल्याने दुभाजकाच्या बॅरिकेट्स देखील तुटल्या.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि आवश्यक त्या उपाय योजना सुरू केल्या आहेत. तसेच या घटनेबाबतचा पुढील तपास सुरू आहे.