प्रतिनिधी /म्हापसा
आल्त कुचेली येथील श्री काजरेश्वर ग्राम देवस्थानचा आज दि. 17 रोजी 11 वा जत्रोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी 11 वा. श्री व सौ. प्रतिमा लक्ष्मण चोडणकर (शेळपे-धुळेर) यांच्या यजमानपदाखाली धार्मिक विधी व सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद, सायं. 6 वा. कुचेली येथील सिद्धीविनायक लईराई आरती मंडळातर्फे घुमट आरती, सायं. 6.30 वा. प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते काजरेश्वर रंगमंचावर दीपप्रज्वलन होईल. सायं. 7 वा. ‘असूर मर्दन’ नाटय़प्रयोग होईल. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.