वृत्तसंस्था / पलक्कड
पेप्सिको या कंपनीने आपला केरळमधील पलक्कड येथील उत्पादन कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. कामगारांच्या होत असणाऱया सलगच्या विरोधामुळे पेप्सिको आपला तेथील कारखाना बंद करण्याचे संकेत आहेत. या निर्णयामुळे जवळपास 500 जण बेरोजगार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चालू वर्षात 22 मार्चपासून कंपनीने हा कारखाना बंद केला होता. यासोबत जवळपास पहिला सॉफ्ट ड्रिंकचा प्रकल्प राबवणाऱया कोक कंपनीनेही राज्यामधील आपला प्रकल्प बंद केला आहे. पलक्कडमधील पेप्सिकोचा कारखाना वरुण बेव्हरेजेस लिमिटेडकडून संचालित केला जात होता. परंतु अंतिम क्षणी राज्याने कामगार विभागाला कारखाना बंद करण्याची नोटिस दिलेली आहे.
सदरच्या कारखान्यात मागील वर्षातील डिसेंबर महिन्यात कामगारांनी आंदोलने सुरु केली होती.
यात माकपाशी संबंधीत सीआयटीयू, काँग्रेसशीसंबंधीत आयएनटीयूसी आणि आरएसएसशी संबंधीत भारतीय कामगार संघाच्या सदस्यांचा समावेश राहिलेला आहे. कंत्राटी कामगारांना विविध सुविधा मिळाव्यात यासह अन्य कोणतेही निर्णय कंपनी घेत नसल्याच्या विरोधात ही आंदोलने करण्यात आल्याची माहिती आहे.
उत्पादनास प्रारंभ
सदरचा कारखाना हा पलक्कड येथील उद्योग क्षेत्र कोजिकोडमध्ये वर्ष 2001 मध्ये स्थापन करण्यात आला होता. यामध्ये पेप्सी बँडचे पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर आणि सॉफ्ट ड्रिंक यांचे उत्पादन घेण्यात येत होते. कर्मचारी वादानंतर मात्र हा व्यवसाय बॉटलिंग पार्टनर वरुण बेव्हरेज यांच्याकडे 2019 मध्ये देण्यात आला होता.