प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात शुक्रवारी, 1456 जण कोरोनामुक्त झाले, त्यामुळे सक्रीय रूग्णसंख्या 14 हजारांच्या खाली आली. गेल्या 24 तासांत कोरोनाने 38 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये जिल्हय़ातील 34 तर सांगली, सिंधुदुर्गातील प्रत्येकी दोघे आहेत. गेल्या 24 तासांत 1 हजार 337 नवे रूग्ण आढळले. गुरूवारी कोरोना मृत्यू, सक्रीय रूग्ण वाढले तर नव्या रूग्णांत घट झाली होती. शुक्रवारी मृत, सक्रीय रूग्णांत घट झाली तर नव्या रूग्णांत वाढ झाली आहे. तरीही कोरोनावर नियंत्रण मिळतेय, असे दिलासादायी चित्र दिवसभर कायम राहिले.
जिल्हय़ात शुक्रवारी कोरोनाने 38 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये परजिल्हय़ातील चौघांचा समावेश आहे. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 3 हजार 270 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 1 हजार 660, नगरपालिका क्षेत्रात 532, शहरात 673 तर अन्य 405 आहेत. सक्रीय रूग्णसंख्या 13 हजार 963 आहे. दिवसभरात 1 हजार 456 कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 77 हजार 370 झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिले.
जिल्हय़ात गेल्या 24 तासांत 1 हजार 337 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 23, भुदरगड 23, चंदगड 38, गडहिंग्लज 70, गगनबावडा 8, हातकणंगले 153, कागल 40, करवीर 180, पन्हाळा 82, राधानगरी 29, शाहूवाडी 6, शिरोळ 112, नगरपालिका क्षेत्रात 170 कोल्हापुरात 272 तर अन्य 131 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 94 हजार 603 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून शुक्रवारी 2 हजार 617 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 93 निगेटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टचे 1 हजार 767 अहवाल आले. त्यातील 1 हजार 372 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार 473 रिपोर्ट आले. त्यातील 818 निगेटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
कोरोनाने मृत्यू झालेल्यांत तुंग मिरज 31 वर्षीय पुरूष, रेठरे धरण वाळवा येथील 73 वर्षीय महिला, फोंडाघाट कणकवली येथील 43 वर्षीय पुरूष आणि कुडाळ येथील 39 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. कोरोना मृतांमध्ये कोल्हापूर जिल्हय़ातील बोरवडे, प्रयाग चिखली, हातकणंगले शांतीनगर पाचगाव, कणेरी पन्हाळा, शिवाजी पेठ, रूकडी, पाचगाव, कळंबा, इचलकरंजी शहापूर, जवाहरनगर, सुदर्शन चौक, कांरडे मळा, टेकवडे, चंदूर, तेरवाड, चंदूर, सांगवडे, सुळे आजरा, दुंडगे, शिरटी, खेरीवडे, पन्हाळा, भामटे, इचलकरंजी, सुळकुड, मंगळवार पेठ, गाडेगोंडवाडी, उचगाव, हालोंडी, उजळाईवाडी, कंदलगाव, हुपरी, गडहिंग्लज येथील व्यक्तींचा समावेश आहे.
Previous Articleकोल्हापूर महापालिकेला मिळणार कार्डियाक ऍम्ब्युलन्स
Next Article नुकसानग्रस्तांना आठवडाभरात मदतीचे वाटप
Related Posts
Add A Comment