जिल्ह्यात 13 केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस, बुधवारी 60 टक्के लसीकरण उद्दिष्टाची पुर्ती
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्यात आरोग्य विभागातील स्टाफ, आशा स्वयंसेविकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. बुधवारी जिल्ह्यातील 13 केंद्रांवर 1 हजार 192 जणांनी ही लस टोचून घेतली. त्यामुळे दिवसभरात 60 टक्के उद्दिष्टपुर्ती झाल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस, कोव्हिशिल्ड पहिल्या दिवशी 11 केंद्रांवर देण्यात आली. यात बहुतांसी आशा स्वंयसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षिका होत्या. पहिल्या दिवशी लसीकरणाची टक्केवारी 50 इतकी होती. हळूहळू त्यामध्ये वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यातील 13 केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार, शनिवारी लसीकरण पेले जात आहे. कोरोनामध्ये आघाडीवर राहिलेल्यांना ही लस प्राधान्याने दिली जात आहे. बुधवारी जिल्ह्यात 1 हजार 192 जणांना कोव्हिशिल्ड लस टोचण्यात आल्याची माहिती डॉ. देसाई यांनी दिली.