वार्ताहर/ संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील खाडीभागाला नैसर्गिक सौदर्य लाभलेले आहे. खाडीभागाची जमिनीची धूप थांबविण्यासाठी खारफुटी ही वनस्पती महत्वाची भुमिका बजावत असते. मात्र हीच खारफुटी नष्ट होत असून तीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
फुणगूस,करजुवे,माखजन आणि डिंगणी गावात खाडीभागाला खारफुटी वनस्पती मोठया प्रमाणात सापडते. समुद्राला भरती आली की खाडीभागातील पाणी वाढते. यावेळी खारफुटी वनस्पती जमिनीची धूप न देताना संरक्षण करण्याचे काम करीत आहे. धूप थांबविणारी ही वनस्पती जतन न केल्याने ती नष्ट होत चालली आहे. खारफुटी जंगलाची तोड होत असल्याने ती नष्ट होत आहे. तर नवीन वनस्पतीचे लागवड केली जात नसल्याने खारफुटी वनस्पतीचे अस्तित्व धोक्यात येवू लागले. संगमेश्वर तालुक्यातील वनप्रेमींना या गोष्टीकडे लक्ष देवून जतनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.