कांपाल पणजी येथे प्रजासत्ताक दिन

प्रतिनिधी /पणजी

गोव्याचे राज्यपाल श्री. पीएस श्रीधरन पिल्लई यांनी प्रत्येक नागरिकाला त्यांच्या समृद्धीसाठी किमान अन्न, निवारा, आरोग्य आणि शिक्षणाची हमी देणारे कल्याणकारी राज्य होण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी गोवा कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. कांपाल पणजी येथे आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकाविल्यानंतर ते बोलत होते.
पुढे बोलताना राज्यपाल श्री. पिल्लई यांनी राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. गेल्या काही वर्षांत आपल्या संविधानात अनेक बदल झाले असले तरी त्याची अखंडता जपली गेली आहे. आपली राज्यघटना हा देशाच्या विविध संस्कृतींना बांधून ठेवणारा आणि देशाची एकात्मता टिकवून ठेवणारा एक अतिशय भक्कम आणि बहुमुखी दस्तऐवज आहे असे ते म्हणाले.
मला हे सांगायला आनंद होत आहे की गोव्यातील पात्र लोकसंख्येपैकी 98ज्ञ् लोकांचे लसीकरण झाले आहे त्यात 15-18 वयोगटातील लोकांचा सहभाग आहे आणि 60 वर्षांवरील लोकांसाठी बूस्टर डोससह पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. या प्रसंगी मी सर्व डॉक्टर्स, प्रंटलाइन आणि आरोग्य सेवा कर्मचाऱयांना महामारीपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेला सलाम करतो.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाचे राज्यपालांनी कौतुक केले या दिवसाचे स्मरण तरुण पिढीला धैर्य आणि अभिमानाने प्रेरित करील ज्यामुळे त्यांना राष्ट्राच्या अधिक गौरवासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळेल असे ते पुढे म्हणाले.
राज्यातील निसर्गसौंदर्य आणि शांतता, संस्कृती आणि लोकांचा आदरातिथ्य, वनसंपदेमुळे राज्यातील पर्यटन वाढीस हातभार लागला आहे. कोविड-19 महामारीमुळे पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे असे सांगून राज्यपालांनी आगामी काळात आरोग्यदायी जीवन होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राज्यपाल श्री. पिल्लई यांनी गोव्यातील सर्व मतदारांना कोविड शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करून मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले. देशाच्या संविधानाशी नि÷ावान राहण्याची शपथ घ्य?ण्याचे आवाहनही त्यांनी लोकांना केले.
राज्यपालांनी गोव्यातील पात्र लोकसंख्येपैकी 98ज्ञ् लोकांचे लसीकरण झाले आहे त्यात 15-18 वयोगटातील लोकांचा समावेश आहे आणि 60 वर्षांवरील लोकांसाठी बूस्टर डोससह पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. या प्रसंगी मी सर्व डॉक्टर्स, प्रंटलाइन आणि आरोग्य सेवा कर्मचाऱयांनी महामारीपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेची राज्यपालानी प्रशंसा केली..
उच्च दरडोई उत्पन्न, मानव विकास निर्देशांकात देशात तिसरे स्थान, अन्न सुरक्षा निर्देशांकात तिसऱयांदा सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य, पायाभूत सुविधांसाठी सर्वोत्तम अशी राज्याची प्रभावी कामगिरीबद्दल राज्यपालांनी प्रशंसा व्यक्त केली. शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये गोव्याने 75 पैकी 72 गुण मिळवून देशात चौथा क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ पाणी आणि स्वच्छता आणि पर्यायी स्वच्छ ऊर्जा ही दोन उद्दीष्टे साध्य करणारे गोवा एकमेव राज्य आहे असे ते म्हणाले.
सुरवातीस राज्यपाल श्री. पिल्लई यांनी मानवंदना स्वीकारली आणि संरक्षण दल, महाराष्ट्र पोलिसांचा ताफा, तटरक्षक दल, एनसीसी कॅडेट्स आणि होमगार्डच्या संचलनाची पाहणी केली.
राज्यपाल श्री. पिल्लई यांनी पोलीस अधीक्षक श्री. सॅमी तावारीस यांना पोलीस खात्यातील त्यांच्या असामान्य सेवेबद्दल आणि पोलीस निरीक्षक श्री.दत्ताराम राऊत यांना त्यांच्या असामान्य सेवेबद्दल राष्ट्रपती पदक प्रदान केली. नागरी विमान वाहतूक संचालक डॉ.सुरेश शानभोगे आणि सुरक्षा अधिकारी, सचिवालय श्री. सेबॅस्तियान एम. गुदिन्हो यांना त्यांनी राज्यासाठी केलेल्या अतुलनीय सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक, प्रथम महिला श्रीमती रीता पिल्लई, मुख्य सचिव श्री परिमल राय, आयएएस, सरकारचे सचिव, वरिष्ट सुरक्षा अधिकारी आणि राज्य तसेच केंद्र सरकारचे वरिष्ट अधिकारी उपस्थित होते.