प्रतिनिधी/ रत्नागिरी
शुक्रवारी जिह्यामध्ये कोरोनाच्या केवळ 21 चाचण्या झाल्या व त्यात 8 नमुने कोरोनाबाधित आढळून आले. शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या 42 रूग्णांना घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्या रूग्णांची संख्या 8 हजार 25 झाली आह़े सलग दुसऱया दिवशी एकाही कोरोना मृत्यूची नोंद झालेली नाही. जिह्यात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 94.34 टक्के झाले आह़े जिह्यामध्ये शुक्रवारी आरटीपीसीआर चाचणीत 1 तर ऍन्टीजेन चाचणीत 7 नवे कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये दापोलीतील 4, खेड व संगमेश्वर प्रत्येकी 1 तर रत्नागिरीतील 2 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 8 हजार 506 झाली आह़े
एकूण रूग्ण-8506
नवे रूग्ण -08
नवे मृत्यू -00
एकूण मृत्यू -317