मुंबई \ ऑनलाईन टीम
बंगाल निवडणूक विजयानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना धमकी वजा इशारा दिला होता. छगन भुजबळ तुम्ही जामिनावर बाहेर आहात. निर्दोष सुटलेले नाहीत. फार बोलू नका. नाही तर महागात पडेल, असा धमकी वजा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. आता त्यांच्या या धमकीला छगन भुजबळ यांनी उत्तर दिले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, ममता बॅनर्जी या झाशीच्या राणी सारख्या एकहाती लढल्या. झाशीच्या राणीने मेरी झाशी नही दुंगी असं म्हटलं होतं. ममता दीदींनीही मेरा बंगाल नही दुंगी असं म्हटलं. माझ्या या विधानावर रागावण्यासारखं काय आहे? आता पराभवाची सवय करून घेतली पाहिजे. पराभव सहन करायला हवा. आता वारंवार फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार आहात?, असा टोला देखील त्यांच्याकडून लगवण्यात आला.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, समीर भुजबळ जेलमध्ये असताना चंद्रकांतदादांकडे मदत मागायला कसा जाईल? सीबीआय, ईडीचा राजकीय उपयोग होतो हे माहीत होतं. आता न्याय देवताही त्यांच्या हातात आहे का? असा प्रश्न मला पडला आहे. तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे ईडी किंवा सीबीआय नाही, असं सांगतानाच अचानक झालेल्या पराभवाने मानसिक गडबड होणं स्वाभाविक आहे. तसेच बंगाल निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा केवळ अदृश्य हातच नाही तर स्पष्ट हात होता, असं देखील ते यावेळी म्हणाले.
Previous ArticleNEET-PG परीक्षा 4 महिने लांबणीवर
Next Article सातारा जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन
Related Posts
Add A Comment