तुळजापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या साक्षीने मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलनाच्या तिसऱ्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. याप्रसंगी खासदार छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते. मराठा आंदोलनाचा प्रारंभ तुळजाभवानी देवीच्या महाद्वारात जागरण – गोंधळ घालून करण्यात आला. यानिमित्ताने तुळजापुरातील सर्वच रस्त्यांवर मराठा समाज बांधवांनी गर्दी केली. त्यामुळे सारा परिसर भगवामय झाला. मराठा समाजाचा मोठा एल्गार दिसून आला. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर समाजबांधव आक्रमक झाले आहेत़. आरक्षणाबाबतचा निर्णय तातडीने होण्यासाठी तिसरे पर्व सुरु करण्यात आले. यापूर्वीचे देखील मराठा समाजाची मूकमोर्चा सारखे आंदोलने मराठवाड्यातून सुरू करण्यात आली होती. आताही आंदोलनाचा शुभारंभ मराठवाड्याची पंढरी समजल्या जाणाऱ्या तुळजापुरातून झाला.
खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी तुळजाभवानी देवीच्या महाद्वारासमोरील मुख्य मंचावर येऊन अभिवादन केले़ आणि लगेचच ते मंचाखाली उतरुन मोर्चेकऱ्यांमध्ये सहभागी झाले़. उन्हातही त्यांनी रस्त्यावरच बैठक घालून आंदोलनात नोंदविलेला सहभाग आंदोलनकर्त्यांचे मनोधैर्य आणखीनच उंचावणारा ठरला. याप्रसंगी खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनीही मोर्चेकऱ्यांमध्ये सहभागी होत रस्त्यावरच बैठक घातली.
Trending
- जिह्याचा उत्कृष्ट विकास आराखडा सादर करा; जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आवाहन
- पन्हाळा तालुक्यात धूळवाफ भात पेरणीची धांदल; अंतरमशागतीसाठी जोर
- आंबोली – माडखोल रस्त्याचे काम म्हणजे केवळ मलमपट्टीच!
- दुर्गराज रायगडवरील गाईडना मिळणार आरोग्य विम्याचे संरक्षण
- malvan :कोळंबमध्ये दोघा महिलांचा सत्कार
- sawantwadi :सैनिक मुलांच्या वसतिगृहाला माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक मदत
- भाजप कोल्हापूर शहर अध्यक्षपदाचा सस्पेन्स वाढला!
- बारसू प्रकल्पाविरोधात राज्यव्यापी आंदोलन