ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यातच देशाची राजधानी नवी दिल्लीत मागील 65 दिवसांमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली दिसून आली होती. सोमवारी केवळ 613 रुग्ण आढळले होते. मात्र, मंगळवारी पुन्हा एकदा रुग्ण संख्येत मोठी वाढ झालेली दिसून आली.
मागील 24 तासात दिल्लीत 1,056 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 28 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 32 हजार 275 वर पोहचली आहे. यामधील 10 हजार 887 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मंगळवारी 1135 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 17 हजार 507 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 3881 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 9 लाख 76 हजार 827 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 4843 आरटीपीसीआर टेस्ट आणि 1370 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.