प्रतिनिधी / खेड
कोकण मार्गावर चालवण्यात येणाऱ्या नागपूर-मडगाव साप्ताहिक फेस्टिवल स्पेशल रेल्वेगाडीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ८ ते २ ९ जानेवारी याकालावधीत ही गाडी दर शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता नागपूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.४० वाजता मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून दर शनिवारी सायंकाळी ७.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ८.३० वाजता नागपूरला पोहचेल. कोकण मार्गावर या गाडीला पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. २२ डब्यांची ही गाडी पूर्णपणे आरक्षित आहे.