ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये पोलिसांनी आज दुपारी दहशतवादी अड्डा उध्वस्त केला.
एसओजी पुंछ आणि लष्कराला दहशतवादी अड्डयाची माहिती मिळाली होती. त्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोधमोहिमेदरम्यान हा दहशतवादी अड्डा उध्वस्त करण्यात आला. त्या ठिकाणाहून एक एके-५६ रायफल, एके-५६ एके रायफलचे ३० राऊंड, दोन चिनी पिस्तूल आणि एक पिस्तूल मॅगझिन जप्त करण्यात आले आहे. या संदर्भात पूंछ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे.