राष्ट्रवादी काँग्रेसचे मालवण तहसीलदारांना निवेदन
वार्ताहर / मालवण:
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे वाढते दर कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा. वाढत्या महागाईबाबत सर्वसामान्य जनतेच्या तीव्र भावना केंद्र शासनापर्यंत पोहोचवाव्यात, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी मालवण तहसीलदार अजय पाटणे यांना दिले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर, शहर अध्यक्ष आगोस्तीन डिसोजा, महिला तालुकाध्यक्षा सदफ खटखटे, श्रीहरी खवणेकर, रमण वाईरकर, धंदाळ डिसोजा, शहर उपाध्यक्ष बाबू डायस आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, कोरोना काळाचा विचार करता, बहुतांश नोकरी, उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत. वाहन चालविणेही सर्वसामान्य जनतेस कठीण झाले आहे. त्यासोबत गॅसचे वाढते दरही चिंता वाढविणारे आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या सर्व वाढत्या दरांना केंद्र शासन जबाबदार आहे. केंद्र शासनाने हे दर कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा.