वाहने, शस्त्रास्त्रांची केले पूजन
प्रतिनिधी /बेळगाव
पोलीस मुख्यालयात गुरुवारी खंडेनवमीनिमित्त शस्त्रपूजा करण्यात आली. वरिष्ट अधिकाऱयांनीही या पूजा कार्यक्रमात भाग घेतला. पोलिसांनी आपली वाहने स्वच्छ करून खंडेपूजेनिमित्त ती सजविली होती.
पोलीस मुख्यालयातील शस्त्रागारात खंडेनवमीची पूजा असते. वाहने स्वच्छ करून त्यांचे पूजन करण्याबरोबरच शस्त्रास्त्रांचे पूजन केले जाते. वर्षानुवर्षे ही प्रथा सुरू आहे. गुरुवारी मुख्यालयात शस्त्रास्त्रांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा आदींसह जिल्हा व शहर सशस्त्र दलातील अधिकाऱयांनी पूजेत भाग घेतला.