ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलीवुडमधील प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण झाली आहे. कुमार सानू यांच्या टीम ने फेसबुकद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितनुसार, कुमार सानू गुरुवारी (15 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता दुबईच्या मार्गाने अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात जाणार होते. पण विमानाने प्रवास करण्यापूर्वी कोरोनाची तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचे अमेरिकेत जाणे रद्द झाले. बीएमसीने त्यांना होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे.
कुमार सानू यांची पत्नी सलोनी आणि मुली शनॉन व ॲनाबेल अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात राहतात. तसेच येत्या 20 ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस असून हा दिवस आपल्या कुटुंबीयांसोबत घालवण्याची इच्छा होती. त्यांना भेटण्यासाठी ते अमेरिकेत जाणार होते. मात्र, आता त्यांना आपला प्लॅन रद्द करावा लागला आहे.
दरम्यान, कुमार सोनू यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच ट्विटरवर कुमार सानू नावाने ट्रेंड सुरू झाला असून गेट वेल सून सोनूदा असे म्हणत चाहत्यांनी त्यांना लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना केली आहे.