ऑनलाईन टीम / पाटणा :
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असतानाच नितीश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये 23 जूनपासून पार्क आणि उद्याने सुरू होणार आहे. सरकारी आणि खाजगी कार्यालये 100 % उपस्थितीत सुरू केली जाणार आहेत. या शिवाय नाईट कर्फ्यू रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत असेल आणि दुकाने देखील सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवली जाणार आहेत. सोमवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

बिहारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधात सूट देण्याबाबत आज आपदा प्रबंधन समूहाची बैठक घेण्यात आली. यामध्ये काही निर्बंधात सूट दिली आहे.

या अंतर्गत सरकारने पार्क आणि उद्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अजूनही मंदिरे, मठ, धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. शिक्षण संस्था देखील 6 जुलै पर्यंत बंदच असतील. त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.