ऑनलाईन टीम / बीड :
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शहरात कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. त्यातच आता बीड जिल्ह्यातही 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी लॉकडाऊनसंबंधी आदेश जारी केली आहेत. या आदेशानुसार बीडमध्ये आता 25 मार्चच्या मध्यरात्रीपासून ते 4 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे.
या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद राहणार आहेत. सर्व खासगी कार्यालये, मंगल कार्यालये, हॉटेल बंद राहणार आहेत. तसेच, अत्यावश्यक सेवेनुसार दुध विक्री आणि मेडिकल दुकाने सुरु राहणार आहेत. तसेच किराणा दुकाने मात्र सकाळी 7 ते 9 या दोन तासाच्या वेळेमध्ये सुरू असतील तेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन सुरु ठेवावीत असे आदेश जगताप यांनी दिले आहेत.