ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 394 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या 18 रुग्णांपैकी 11 जण मुंबईचे, 5 जण पुण्यातील तर मालेगावातील दोन जण आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची एकूण रुग्ण संख्या 6 हजार 817 वर पोहचली आहे. तर राज्यात आत्तापर्यंत 301 जणांचा मृत्यू झाला असून 117 जणांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
राज्यात आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या एक लाख 2 हजार 189 नमुन्यांपैकी 94 हजार 485 जणांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तर 6817 जन पॉझिटिव्ह आहेत.
तसेच सध्या महाराष्ट्रात एकूण 1 लाख 19 हजार 161 लोक होम क्वारंटाईन असून 8 हजार 814 लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
– एकट्या मुंबई 4 हजार 589 कोरोनाग्रस्त
काल एका दिवसात एकट्या मुंबईमध्ये कोरोनाचे 357 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण संख्या 4 हजार 589 वर पोहचली आहे. तर गेल्या चोवीस तासात 11 जणांनी आपला जीव गमावला आहे आणि 595 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.