- राज्यात 3,075; तर मुंबईत 544 नवे रुग्ण
ऑनलाईन टीम / मुंबई :
सोमवारी महाराष्ट्रात 3,075 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 18,55,341 झाली आहे. आज 7,345 रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण 17,30,715 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.28 % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण 75,767 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात आज 40 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.57 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,13,18,721 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18,55,341 (16.39 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,55,180 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,565 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- मुंबईत 544 नवे रुग्ण
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 544 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या 2,86,597 एवढी झाली आहे. तर आज 11 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. तर आता पर्यंत 10,907 मृत्यूची नोंद करण्यात आली.