ऑनलाईन टीम / मुंबई :
गेल्या 24 तासात कोरोना च्या 286 नव्या रुग्णांची भर पडून महाराष्ट्र राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 3202 वर पोहोचली आहे. तर सात जणांनी आपला जीव गमावला आहे. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. यामध्ये मुंबईतील स्थिती चिंताजनक आहे. काल झालेल्या सात मृत्युमध्ये तीन जण मुंबईतील तर चार रुग्ण पुण्यातील आहेत. राज्यात आतापर्यंत 194 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत काल एका दिवसात नवे रुग्ण 177आढळले. त्यामुळे मुंबईतील कोरोग्रस्तांची संख्या 2073 वर पोहचली आहे.
गुरुवारपर्यंत पाठवण्यात आलेल्या 56 हजार 673 पैकी 52 हजार 762 जणांचे प्रयोगशाळेतील नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर राज्यातील 300 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 71 हजार 76 जण होम क्वारंटाईन आहेत. तर 6108 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.