ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 37,154 नवे रुग्ण आढळून आले. तर 724 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 3 कोटी 08 लाख 74 हजार 376 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 4,08,764 जणांनी आपला जीव गमावला आहे.

बुधवारी देशात 39 हजार 649 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 3 कोटी 00 लाख 14 हजार 713 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 4 लाख 50 हजार 899 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल दिवसभरात 12 लाख 35 हजार 287 लसींचे डोस देण्यात आले. तर आतापर्यंत देशातील 37 कोटी 73 लाख 52 हजार 501 जणांना लस देण्यात आली आहे.
दरम्यान, देशातील रिकव्हरी दर आता 97.22 टक्क्यांवर आहे तर ॲक्टिव्ह रुग्णांचा दर 1.46 टक्के आहे. देशाचा दैनिक पॉझिटिव्हिटी रेट 2.59 टक्क्यांवर आहे.
आतापर्यंत देशात 43 कोटी 23 लाख 17 हजार 813 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 14 लाख 32 हजार 343 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 11 जुलै 2021) एका दिवसात करण्यात आल्या.