वार्ताहर /उचगाव
बेळगाव तालुक्मयातील सर्व माध्यमिक शाळांमधून सहामाही परीक्षेला शुक्रवार दि. 7 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. सदर परीक्षा 3 जानेवारीपासून जाहीर करण्यात आली होती. मात्र सध्या विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतल्याने वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला. या परीक्षेला आता शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसानच होत आहे. यावषी शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले. त्यामुळे आता परीक्षाही उशिराच होत आहेत. दरवषी सहामाही परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येत असे. यावषी शैक्षणिक वर्ष पुढे ढकलल्याने या परीक्षा जानेवारी महिन्यात घेण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला असून इयत्ता आठवी, नववी आणि दहावीची सहामाही परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे.
शनिवार दि. 15, शुक्रवार दि. 14 जानेवारीपर्यंत सदर परीक्षा सुरू राहणार आहे. मुख्याध्यापक असोसिएशनने प्रश्नपत्रिका तयार केल्या आहेत. लेखी परीक्षेसोबतच विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे.
शिक्षण खात्याने सहामाही परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र शुक्रवार दि. 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांत सण असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच शनिवारी विकेंड लॉकडाऊन दिवशीही पेपर असल्याने परीक्षा घेण्यात येणार की नाही याबद्दल विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात येणार की यामध्ये पुन्हा बदल होणार, याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
सहामाही परीक्षेचे वेळापत्रक
- 7 जानेवारी…………….. प्रथम भाषा- मराठी
- 8 जानेवारी…………….. विज्ञान
- 10 जानेवारी…………… गणित
- 11 जानेवारी…………… द्वितीय भाषा- कन्नड, इंग्रजी
- 12 जानेवारी…………… तृतीय भाषा- हिंदी, इंग्रजी, कन्नड
- 13 जानेवारी…………… समाज विज्ञान
- 14 जानेवारी…………… शारीरिक शिक्षण व चित्रकला