ऑनलाईन टीम
राज्यात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं नाही, तर राजकीय संन्यास घेईन, अशी घोषणा केली. यावर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाष्य केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनीही आपली भूमिका मांडली आहे.
मी त्यांची भेट घेईन, मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही. फडणवीसांनी फकीर होण्याची भाषा करणं योग्य नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. देशात आणि राज्यात फार कमी चांगली नेतृत्व आहेत. त्यापैकी फडणवीस एक आहेत. त्यामुळे त्यांनी संन्यास घेतला तर भाजप आणि जनतेचेही मोठे नुकसान होईल, असं राऊत म्हणाले.
दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. २६ जूनला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच मला सत्ता द्या, तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण देईन, नाहीतर राजकारणातून कायमचा संन्यास घेईन, असा दावा केला होता.
यावर आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून राऊत यांनी फडणवीसांना शाब्दीक टोले लगावले आहेत. आम्हाला चिंता मराठा आणि ओबीसी आरक्षणाची आहेच, पण फडणवीस यांनी केलेल्या राजकीय संन्यास घेण्याच्या घोषणेची देखीलआहे. फडणवीसांनी असा त्रागा करून घेऊ नये. सर्वकाही सुरळीत व त्यांच्या मनाप्रमाणे होईल. संन्यास घेतील त्यांचे दुष्मन!,” अशा शब्दात शिवसेनेनं चिमटे काढले आहेत. तसेच ओबीसी नेत्यांचे तिकीट कापून त्यांचे पंख छाटणारे हात कोणाचे होते, हे महाराष्ट्राला कळू द्या, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.
Previous Articleआचरा ग्रामपंचायत कडून बचतगटाला मोफत हळदीचे वाटप
Next Article जम्मू लष्करी स्थानकाजवळ 2 अज्ञात ड्रोनचा वावर
Related Posts
Add A Comment