नवी दिल्ली
पॅकेजिंगच्या व्यवसायात लक्ष घालणाऱया मॅक्स वेंचर्सला बांधकाम क्षेत्रात उतरायचे असल्याचे कळते. त्यासाठीची तयारी कंपनीने चालवली आहे. मॅक्स वेंचर्स ही कंपनी पॅकेजिंग फिल्म व्यवसायात कार्यरत असून 600 ते 650 कोटींचा हा व्यवसाय आहे. यातील 51 टक्के हिस्सा विक्री करून कंपनी बांधकाम क्षेत्रात उतरणार आहे, अशी माहिती शेअर बाजाराला देण्यात आली आहे. जपानच्या टोपान प्रिंटींगसोबत भागीदारीतून पॅकेजिंगचा व्यवसाय मॅक्स वेंचर्स करते.