प्रतिनिधी /म्हापसा
म्हापशाचे चंद्रकांत (भाई) पंडित आज 80 व्या वर्षात पर्दापण करीत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मोठय़ा प्रमाणात समाजसेवा केलेली आहे. भाई पंडित यांचे योगदान म्हापशातच नव्हे तर राज्यभर आहे. भारतीय जनता पक्षाचा संत्संग आणि जनता पक्ष यात ते पूर्वीपासून आहेत. पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, असे प्रतिपादन कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी केले.
या कार्यक्रमाला नगरसेवक सुधीर कांदोळकर, माजी नगरसेवक तुषार टोपले, मगोचे निष्ठावंत कार्यकर्ते एकनाथ म्हापसेकर, शिवदास शिरोडकर, जयेश थळी आदी मान्यवर उपस्थित होते. सुधीर कांदोळकर यांनीही भाई पंडित यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी चंद्रकांत (भाई) पंडित यांचा मंत्री मायकल लोबो यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.