ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला देशाचे बजेट मांडणार आहेत. यंदाच्या बजेटचे सादरीकरण हे दरवर्षीपेक्षा काहीसे वेगळे असणार आहे. कारण हे बजेट लाल कपड्यात नव्हे तर ऑनलाईन पद्धतीने सादर होणार आहे. त्यासाठी सीतारामन यांनी युनियन बजेट मोबाईल ॲप लाँच केले आहे.
बजेट ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी डिजीटलायजेशनची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व सदस्यांनाही यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले आहे. बजेटसंदर्भातील प्रश्न आणि त्याची उत्तरेही ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार आहेत.

युनियन बजेट ॲप आर्थिक माहिती विभाग (डीईए) च्या नेतृत्वात नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) तयार केले आहे. हे ॲप यूजर फ्रेंडली इंटरफेस असेल.ॲपद्वारे स्मार्टफोन युजर्स बजेट वाचू शकतात. सर्वसामान्य जनतेपर्यंत हे बजेट पोहचावे हा या ॲपमागचा उद्देश आहे. फायनेंशियल स्टेटमेंट, डिमांड फॉर ग्रांट्स (DG) आणि फायनान्स बिल ही ॲपवर दिसणार असून, ते डाऊनलोड करता येईल.