प्रतिनिधी/ बेळगाव
रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगावतर्फे शिक्षकांसाठी दिला जाणारा नेशन बिल्डर पुरस्कार यंदा सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजित चौगुले यांना देण्यात आला. रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष अरविंद खडबडी, सचिव विनयकुमार बाळीकाई, केतन, डी. बी. पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
कॅम्प येथील मेसॉनिक हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. रणजित चौगुले यांनी ई टिचिंगच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहेत. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या जोडीने केलेल्या नवनवीन उपक्रमांची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.