प्रतिनिधी / रत्नागिरी
चारचाकी वाहनामध्ये ठेवलेला मोबाईल चोरट्याने लांबवल्याची घटना सोमवारी सायंकाळी डीमार्टनजीक घडल़ी या बाबतची फिर्याद संतोष पंडीतराव कोलते (37, शिवाजीनगर,रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष कोलते खरेदी साठीडी-मार्ट येथे आपल्या चारचाकी वाहना मधून पत्नी व मुलांसह गेले होत़े त्यांनी आपली चारचाकी डी-मार्टबाहेर एका दुकानासमोर पार्ककरुन ठेवली होत़ी खरेदी करुन आले असता त्यांच्या पत्नीचा गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवलेला सॅमसंग कंपनीचा सुमारे 10,000 रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्याने लांबवल़ा या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाआह़े अधिक तपास पो.हे.कॉ. इंदुलकर करतआहेत़
Previous Articleकोकणातील पाटबंधारे प्रकल्पांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार
Next Article खेडशीत आर्थिक वादातून मारहाण, एकाला अटक
Related Posts
Add A Comment