कोरोना व्हायरस (कोविड -19) या विषाणूने संपूर्ण जग हादरवून टाकले आहे आणि सर्वांच्या जीवनावर त्यामुळे वाईट परिणाम झाला आहे. भारतीय करमणूक उद्योग यामध्ये वेगळा नाही! सरकारने जाहीर केल्याप्रमाणे लॉकडाऊन दरम्यान पौराणिक मालिका कार्यक्रमांचे पुनरागमन झाले. प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणी जणू पुन्हा उजागर झाल्या आहेत. हे कार्यक्रम पुन्हा चालविण्याच्या या निर्णयाला देशभरातील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. इतर बऱयाच जणांप्रमाणे अभिनेता स्वप्निल जोशी हेही या मालिकांचे पुन:प्रसारण पाहत आहेत. खरं तर, या अभिनेत्याच्या दोन लोकप्रिय मालिका उत्तर रामायण आणि श्री कृष्णा देखील घरोघरी पुन्हा दूरदर्शनवर सुरु झाल्या आहेत.
सर्व प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊन स्वप्निल जोशी यांनी स्वत:चे कला कौशल्य सिद्ध केले आणि सिनेसफष्टीच्या विश्वातही आपला ठसा उमटविला आहे! भारतीय चित्रपटातील लोकप्रिय बालकलाकारापासून ते मराठी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीच्या चॉकलेट बॉयपर्यंत स्वप्निल जोशी यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अलीकडेच ‘समांतर’ या वेबसीरिजने वेब क्षेत्रात आपला धमाकेदार प्रवेश केला. पौराणिक मालिकेच्या पुन: प्रसारणावर बोलताना स्वप्निल जोशी यांनी असे म्हटले आहे की, “लॉकडाऊनमुळे लोकांना मोठा फटका बसला आहे. परंतु आता सर्वांना शांत होण्याची गरज आहे आणि ही शांती त्यांना रामायण, महाभारत आणि श्रीकृष्णासारख्या कार्यक्रमांखेरीज नाही मिळू शकत. तीन प्रसिद्ध मालिकांपैकी अभिनेत्याने दोन मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. उत्तर रामायणातील लव्ह आणि कुशमध्ये कुशचे पात्र आणि श्रीकृष्णा या कार्यक्रमात कृष्णाचे पात्र त्यांनी साकारले. जगात असे कोणीही नाही की ज्याला भगवान राम आणि कृष्णाबद्दल माहिती नाही. या केवळ मालिका नसून बऱयाच लोकांच्या बालपणीचा आणि संस्कृतीचा एक भाग असल्याचे त्याने सांगितले. इतकेच नाही तर स्वप्निल यांचा असा विश्वास आहे की जात किंवा धर्म काहीही असो, रामायण आणि महाभारत या अशा मालिका आहेत की ज्या प्रत्येक भारतीय पाहताना त्याचा आनंद घेत आहे! स्वप्निल जोशी शेवटी म्हणाले, प्रत्येकासाठी त्यांचे बालपण पुन्हा जगण्याची ही एक अप्रतिम संधी आहे! आणि यात मीसुद्धा सामील आहे. व्यक्तिश: मीदेखील माझ्या मुलांबरोबर पुन: प्रसारणाचा आनंद घेत आहे. विशेष म्हणजे स्वप्निलने सांगितले की, त्याची मुले त्याला शोमध्ये ओळखत नाहीत. मी क्रीनवर असल्याचा विश्वास ठेवण्यास मुले नकार देतात. हे शोज केले त्यावेळी मी 9 किंवा 10 वर्षांचा होतो, असे स्वप्निल जोशीने सांगितले.
संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई