ऑनलाईन टीम / कोलकाता :
नॅशनल अवॉर्ड विनर बंगाली फिल्ममेकर बुद्धदेव दासगुप्ता यांचे कोलकातामध्ये निधन झाले असल्याची माहिती समोर येत आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसापासून त्यांना वृद्धापकाळातील आजारांनी घेरले होते. त्यांच्या 5 चित्रपटांना बेस्ट फीचर फिल्म अंतर्गत नॅशनल अवॉर्ड मिळाले आहेत. तसेच 2 चित्रपटांसाठी त्यांना बेस्ट डायरेक्टर म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
बुद्धदेव दासगुप्ता यांनी आपल्या करियरची सुरुवात लेक्चरर म्हणून केली होती. नंतर त्यांनी फिल्ममेकिंग क्षेत्रात पुढे जायचे ठरवले. बुद्धदेव दासगुप्ता यांनी 1968 साली 10 मिंटाच्या एका डॉक्यूमेंट्रीने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले होते. त्यांचा पहिला वहिला सिनेमा ‘दूरात्वा’1978 साली रिलीज झाला होता.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुद्धदेव दासगुप्ता यांच्या निधनामुळे दुख: व्यक्त करत ट्विट केले आहे की, प्रख्यात चित्रपट निर्माते बुद्धदेव दासगुप्ता यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुख: झाले आहे. आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंब, सहकारी आणि प्रशंसकांना सहानुभूती.
पंतप्रधानांकडून श्रद्धांजली अर्पण
चित्रपट कर्मी, विचारवंत आणि कवी श्री बुद्धदेव दासगुप्ता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

श्री बुद्धदेव दासगुप्ता यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख झाले आहे. विविध क्षेत्रातील कामाने त्यांची सामाजाशी नाळ जोडली गेली. ते महान विचारवंत आणि कवीही होते. त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि चाहत्यांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. ओम शांतीi. असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.