नवी दिल्ली : कोविडचे नवे व्हेरियंट ओमिक्रॉनचा झपाटय़ाने प्रसार होत असल्याने इंडोनेशियाच्या बॅडमिंटन संघाने वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या रविवारपासून ही स्पर्धा स्पेनमध्ये सुरू होत आहे. ‘स्पेनमधील हुएल्वा येथे 12 ते 19 डिसेंबर या कालावधीत होणाऱया वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटनमधून इंडोनेशियन संघाने माघार घेतली आहे,’ असे इंडोनेशिया बॅडमिंटनने ट्विट केले आहे. या निर्णयानंतर आता हा संघ लगेचच पुढील वर्षी होणाऱया स्पर्धेची तयारी सुरू करणार आहे, असे ऑल इंडोनेशिया बॅडमिंटन फेडरेशनने म्हटले आहे. युरोपियन देशात ओमिक्रॉन व्हेरियंटचा वेगाने प्रसार होत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Previous Articleमहान योध्याचा दुर्देवी अंत
Next Article मानवतेचा अंतःस्वर !
Related Posts
Add A Comment