गिरीधर चिंडक उपविजेते, महिलांत देविका कांबळे विजेत्या
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
देसूर येथे बेळगाव जिल्हा गोल्फ संघटना आयोजित व्हेगा चषक गोल्फ स्पर्धेत डॉ. दास्तीकोप यांनी विजेतेपद तर गिरीधर चिंडक यांनी उपविजेतेपद पटकाविले. महिला गटात देविका कांबळे यांनी विजेतेपद पटकाविले.
देसूर येथील गोल्फ ग्राऊंडवर आयोजित करण्यात आलेल्या व्हेगा चषक गोल्फ स्पर्धेत कोल्हापूर, हुबळी व बेळगाव येथील जवळपास 60 हून अधिक गोल्फपटूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत डॉ. दास्तीकोप यांनी चॅम्पियनशिप पटकाविली तर गिरीधर चिंडक यांनी उपविजेतेपद पटकाविले. ग्रॉस विजेतेपद राजेश कांबळे तर ग्रॉस उपविजेतेपद करूण नायर शेट्टी यांनी मिळविले. नेट विजेतेपद विवेक अपराज, तर उपविजेतेपद श्रीशैल खोत यांनी पटकाविले. महिला गटात देविका कांबळे व वरिष्ट गटात नेट विजेतेपद रमेश चौगुले यांना मिळाले. एच. कॅप 0-9 मध्ये नेट विजेते अभिषेक उज्जैनकोप्प, एच कॅप 10-18 मध्ये नेट विजेते सुनील पाटील, एच. कॅप 19 वरील नेट विजेते प्रितम नसलापुरे ठरले. या स्पर्धेत लाँगेस्ट ड्राईव्हचा मान राजू टोपण्णावर तर नियरेस्ट टू पिनचा मान सुबोध कित्तूर यांनी मिळविला. माय बिरिओस तरूण शेट्टी यांनी पटकाविले. स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे गोल्फ क्लबचे अध्यक्ष जे. सी. मोहन, सी. एन. पिल्ले, दिलीप चिंडक, जयंत हुंबरवाडी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना चषक, प्रमाणपत्र भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी देसूर गोल्फ संस्थेच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.