शिराळा / प्रतिनिधी
माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत शिराळा ‘शहर हरित शहर’ बनवण्याच्या उद्देशाने शहरात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करुन संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यास अनुसरून आज दिनांक ०१/०१/२०२१ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत नागकट्टा येथे वृक्ष लागवड करण्यात आलेल्या झाडांच्या मशागतीचे काम करण्यात आले. शिराळा नगर पंचायत कार्यालयाकडून माझी वसुंधरा अभियान तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत आठवडयाच्या प्रत्येक शुक्रवारी श्रमदानाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी शहरातील स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध ठिकाणी श्रमदान तसेच स्वच्छतेबाबत जन जागृती करण्यात येते.
आज नव वर्षात पदार्पण करत असताना आयोजित करण्यात आलेल्या श्रमदानात पर्यावरण जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विकास मंत्रालयाच्या सूचनेनुसार पृथ्वी ,जल वायू, अग्नी व आकाश या पंच तत्वांच्या जपणुकीसाठी राबवण्यात येत असलेल्या या अभियानाचा भाग म्हणून हरित शपथ घेऊन नव वर्षाच्या संकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली. श्रमादानांतर्गत लागवड करण्यात आलेल्या झाडांना नगरपंचायतीच्या सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पातून घालण्यात आले.
Previous Articleगांधीनगरातील अनिल विधानी मारहाण प्रकरणी चार जणांना अटक
Next Article कुपवाडमध्ये तिघांवर तलवारीने प्राणघातक हल्ला
Related Posts
Add A Comment