सांगरूळ / प्रतिनिधी
देशासह जगभरात कोरोनामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे रोजगार ,नोकरी, उद्योग धंदे अडचणीत आले आहेत .यातच महावितरण’कडून वाढीव दराने वीज बिल करून भरमसाठ बिल दिले आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे, तेव्हा महावितरण ने विज बिल कमी करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन ग्रामस्तानी शाखा अभियंता ए ए नाकटे यांना दिले.
कोरोनामुळे सार्वत्रिक लॉकडाऊन करण्यात आले होते . या लॉक डाऊन दरम्यान महावितरणाने मीटर रिडिंग न घेतले अथवा संबधीत महिन्याचे बील देण्यात आली नव्हती . मात्र तीन महिन्याची एकदम बीले दिली आहेत . जी बीले देण्यात आली आहेत ती वाढीव दिल्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत . घरगुती विजेचे वाढीव बिल कमी करावे जो पर्यंत शासन निर्णय देत नाही तोपर्यंत वीज बिलाची वसुली करू नका . जर वसुली करण्यास सुरुवात केली तर जो काही अनुचीत प्रकार घडेल त्याला महावितरण जबाबदार असेल असे शिवसेना शाखाप्रमूख प्रशांत नाळे यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले.
दरम्यान सुरेखा सुतार म्हणाल्या , आम्ही शेतामध्ये १०० रू साठी सकाळी ८ वाजल्यापासून सायं ५ वाजेपर्यंत दिवसभर शेतामध्ये राबत असतो आणि लाईट बिले ३००० रु आले आम्ही कोठून भरायचे सांगा अशी कौफियत महिलांच्या वतीने मांडली . यावेळी सांगरूळ ग्रामस्थांच्या वतीने वीज बीला संदर्भात विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी. अनिल घराळ ,मच्छिंद्र मगदूम ,तुषार खाडे, सुनिल खाडे, स्वप्निल नाळे, बाजीराव वातकर ‘तानाजी वातकर, अक्षय चाबूक, कृष्णात खाडे, जनार्दन खाडे, आदी उपस्थित होते.
Previous Articleवाढीव वीज बिले रद्द करा ; करवीर शिवसेनेचे निवेदन
Next Article जपानमधील वर्ण व वंशवाद
Related Posts
Add A Comment