उद्योजकाने तयार करविली विशेष ‘पुष्पा साडी’
दक्षिण भारतीय स्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा ः द राइज’चा जलवा केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर जगभरात दिसून येतोय. सोशल मीडियावरील जनता तर ‘पुष्पा’चे संवाद, जबरदस्त गाणी आणि त्याच्या बिनधास्त हुक स्टेप्सची चाहती झाली आहे. चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्याच्या हुक स्टेप्सवर देशविदेशातही इन्स्टाग्राम रील्सचा महापूर दिसून येतोय. आता पुष्पा राज आणि श्रीवल्लीयुक्त साडी चर्चेचा विषय ठरली ओह.

सूरतमधील प्रसिद्ध कापड बाजारातही ‘पुष्पा’ क्रेज दिसून येते. तेथे एका साडी व्यापाऱयाने ‘पुष्पा’चे पोस्टर प्रिंटयुक्त साडी विकण्यास सुरुवात केली आहे. या साडय़ांना लोकांकडून मोठी मागणी असल्याचे सांगण्यात येते. ‘चरनजीत क्रिएशन’ या नावाने साडय़ांचा व्यापार करणाऱया चरणपाल सिंह यांनी या विशेष साडय़ा तयार करवून घेतल्या आहेत.
विविध भागांमध्ये मोठी मागणी
चित्रपटाची लोकप्रियता पाहता चरणपाल यांनी प्रारंभी दोन साडय़ांना ‘पुष्पा’ स्टाइल दिली होती. त्यानंतर सोशल मीडियावर त्याची छायाचित्र केल्यावर देशाच्या विविध भागांमधून त्यांना ऑर्डर्स मिळू लागल्या. राजस्थान, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि बिहार इत्यादी राज्यांच्या कापड व्यावसायिकांकडून ‘पुष्पा साडी’ची ऑर्डर मिळत असल्याचे चरणपाल यांनी सांगितले आहे.
राष्ट्राध्यक्ष असावा तर असा
मानसिकदृष्टय़ा कमजोर मुलीची विद्यार्थी करायचे चेष्टा
राष्ट्राध्यक्षांनी तिला घरापासून शाळेपर्यंत नेऊन सोडले
बहुतांश लोकांनी ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट पाहिला असेल. एक मानसिकदृष्टय़ा कमकुवत मुलाला त्रास दिला जात असतो, परंतु एक शिक्ष त्याला हिंमत आणि प्रेम देतो, मग त्या मुलाचे आयुष्यच बदलून जाते. असेच प्रकरण युरोपमधील छोटा देश रिपब्लिक ऑफ नॉर्थ मेसेडोनियातून समोर येत आहे. येथील 11 वर्षीय मानसिकदृष्टय़ा कमकुवत मुलीला देशाचा अध्यक्ष शाळेपर्यंत तिचे बोट पकडून सोडण्यास गेला होता.
या 11 वर्षीय मुलीचे नाव एम्बला एडेमी असून ती गोस्टीवार येथील एका शाळेत शिकते. एम्बला जन्मापासूनच मानसिक आणि शारीरिक दृष्टय़ा अन्य मुलांप्रमाणे सक्रीय नाही. याला वैद्यकीय भाषेत डाउन सिंड्रोम म्हटले जाते. राष्ट्राध्यक्ष स्टीवो पेंड्रोवस्की यांना एम्बलाला शाळेतील अन्य विद्यार्थी त्रास देतात आणि तिची थट्टा करत असल्याचे कळले.
मग काय घडते…
स्टीवो यांनी त्यानंतर एम्बलाच्या पालकांना फोन करून मुलीविषयी जाणून घेतली तसेच त्यांच्या घरी येण्यासाठीची अनुमती मागितली. मग एकेदिवशी एम्बलाच्या घरी एक भेटवस्तू घेऊन ते पोहोचले. भेटवस्तूदाखल त्यांनी तिला कलर पेन्सिल्स आणि ड्रॉइंग शीट्स दिल्या. एम्बलाच्या पालकांनी आपल्याला दैनंदिन जीवनात कुठल्या अडचणींना तोंड द्यावे लागते हे अध्यक्षांना सांगितले. शाळांमध्ये अशाप्रकारच्या मुलांसोबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये म्हणून कायदा आणला जाईल. सामाजिक क्षेत्राची जबाबदारीही निश्चित केली जाईल असे अध्यक्षांनी मुलीच्या पालकांना सांगितले.
तो क्षणही आला
एम्बला आणि तिच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी स्टीवो यांनी एक निर्णय घेतला. मुलीच्या वडिलांसोबत त्यांनी तिचे बोट पकडून आणि पायी चालून शाळेत नेऊन सोडले. अध्यक्षांची याप्रसंगीची छायाचित्रे आणि चित्रफिती आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. देशभरातून स्टीवो यांचे कौतुक केले जात आहे. एक देश आणि एक नागरिक म्हणून प्रत्येकाला समानतेचा अधिकार मिळावा ही आमची जबाबदारी आहे. एम्बलासारख्या मुलांसाठी आम्हाला एकजूट व्हावे लागेल. कुठलेच मूल मागे राहू नये. विशेषकरून विशेष गरजा तसेच विशेष देखभालीच्या गरज असलेली मुले मागे राहू नयेत असे अध्यक्ष स्टीवो यांनी म्हटले आहे.