प्रतिनिधी / सातारा
शहरात भटक्या कुत्रांच प्रमाणात वाढ झाली आहे. नागरिक अगोदरच कोरोनामुळे वैतागून गेले आहेत. त्यातच भकट्या कुत्रांनी ताळ सोडला आहे. भेसूर ओरडत असल्याने नागरिकांच्या झोपा लागत नाहीत. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली जात नाही. नागरिकांच्या हितासाठी आंदोलन पालिकेसमोर अनोख्या पद्धतीने करावे लागेल, त्या आंदोलनाने नक्कीच पालिकेला जाग येईल, असा इशारा नगरसेवक धनंजय जांभळे यांनी दिला आहे. दरम्यान, त्यांनी शहरात लावलेल्या झाडांची निगा राखली जात नाही, असा ही आरोप केला आहे.
त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरात प्रत्येक वॉर्डात मोकाट कुत्रांचा सुळसुळाट झाला आहे.लॉक डाऊन मध्ये रस्ते निर्मनुष्य असले तरी ही कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या मोकाट कुत्रांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.शहरात ही भटकी कुत्री दिवसा रात्री बेसुरपणे रडत असतात. पालिकेकडे या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी केली आहे. मध्यंतरी डॉग व्हॅन खरेदी करण्याचा प्रस्ताव अडकून पडला आहे.
आरोग्य विभागाने निर्बिजकरण करणाऱ्या डॉक्टरचे पैसेच दिले नाहीत. आरोग्य विभागाचे रटाळ काम असल्याने मोकाट कुत्री वाढली आहेत.त्यांचा बंदोबस्त करावा, तसेच अमृत योजनेतून शहरात झाडे लावली आहे. त्या झाडांची निगा योग्य पद्धतीने राखली जात नाही.या मागणीचा विचार न केल्यास अनोखे आंदोलन करण्यात येईल.,झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्यात येईल, असा इशारा जांभळे यांनी दिला.
Previous Article‘ऑनलाईन’ शिक्षणामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात
Next Article सोलापूर शहरात आज नव्याने ५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
Related Posts
Add A Comment