ऑनलाईन टीम / म्हसवड :
शिवसेना नेते शेखर गोरे यांच्यासह 6 जणांवर म्हसवड पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. धनाजी आबाजी शिंदे (वय 48, रा. पानवन, ता. माण, जि. सातारा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती.
शेखर भगवान गोरे, संग्राम अनिल शेटे, राहुल अर्जुन गोरे, विरकुमार पोपटराव गांधी, राजेंद्र ब्रम्हदेव जाधव आणि हरिदास गायकवाड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धनाजी जाधव आणि त्यांचा मित्र छबू चव्हाण यांना 25 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता जबरदस्तीने एका इनोव्हा गाडीत बसवण्यात आले. त्यानंतर त्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत कुळकजाई येथील फार्महाऊस आणि ठाणे येथील लॉजवर डांबून ठेवण्यात आल्याचे जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे. म्हसवड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.