बिनविरोधची परंपरा असणार की निवडणूक होणार?
सातारा / प्रतिनिधी :
वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्या बोपेगावची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. गावात निवडणूकीचे वातावरण तयार झाले आहे. माजी खासदार कै. लक्ष्मणराव पाटील यांच्या कार्यकाळापासून गावात बिनविरोधची परंपरा आहे.
गावात 9 भावक्यातुन 9 उमेदवार बिनविरोध निवडून दिले जातात. यावर्षी ही तीच परंपरा राखली जाणार की खंडित होणार हे गावात जाऊन तरुण भारतने जाणून घेतले तर 90 टक्के ग्रामस्थ म्हणतात की, बिनविरोध होणार तर 10 टक्के ग्रामस्थ म्हणतात की, तरुण पोरांचं काही सांगू शकत नाही. रात्रीच आमदार मकरंद पाटील यांचे बंधु जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी गावात बैठक घेतली असल्याचे समजले. त्यामुळे अर्ज भरण्यास अजून तीन दिवस बाकी असल्याने नेमके चित्र स्पष्ट होईल.