● कराड तालुक्यात सर्वाधिक 16
● फलटण 8, जावली 7, वाई 3
● सातारा, कोरेगाव, खंडाळा, पाटण, खटाव प्रत्येकी 1
● कराड शनिवार पेठेतील बाधित वृद्धाचा मृत्यू झालाय
● मलकापूर महिलेचा मृत्यू, स्त्राव तपासणीला पाठवले
सातारा, प्रतिनिधी
जिल्ह्यातला धोका दिवसेंदिवस वाढत आहे. हा आठवडा तर प्रचंड वेगाने कोरोना बाधित असल्याचा आकडा मोठा असल्याचे दाखवत आहे. सोमवारी पुन्हा त्यात 39 ची भर पडली असल्याने एकूण आकडा 1 हजार 12 इतका वाढला आहे. सातारा जिल्हा महाराष्ट्रातील पहिल्या 10 जिल्ह्यात गेला असल्याचे स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात 39 नागरिकांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह
खटाव 1 तालुक्यातील बोंबाळे येथील 20 वर्षीय महिला
जावली 7 तालुक्यातील रामवाडी येथील 27 व 48, 30 वर्षीय महिला, 5 वर्षाचा बालक, आखेगनी येथील 68 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, बिरामनेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष
कराड 16 तालुक्यातील गोळेश्वर येथील 46 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 40, 20, 45, 65 वर्षीय महिला 12 मुलगी, 20 वर्षीय युवक, 8 वर्षाचा मुलगा, उब्रंज येथील 47 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, 43 वर्षीय पुरुष, मसूर येथील 10 वर्षाचा मुलगा, 50 वर्षीय महिला, 56, 27, 23 वर्षीय पुरुष
पाटण 1 तालुक्यातील सांघवड येथील 31 वर्षीय पुरुष
फलटण 8 तालुक्यातील जिंती येथील 44 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 26, 27 वर्षीय महिला, 9, 6, 4 वर्षाची मुलगी, 7 वर्षाचा मुलगा, अलगुडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष
वाई 3 तालुक्यातील वाघजाईवाडी येथील 44 वर्षीय महिला, पसरणी येथील 47 वर्षीय महिला, कवठे येथील 35 वर्षीय पुरुष
सातारा 1 तालुक्यातील नागठाणे येथील 53 वर्षीय पुरुष
कोरेगाव 1 तालुक्यातील चौधरवाडी येथील 32 वर्षीय पुरुष
खंडाळा 1 तालुक्यातील शिरवळ येथील 34 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
कराड शनिवार पेठेतील बाधित वृद्धाचा मृत्यू झाला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे शनिवार पेठ, कराड येथील 75 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
संशयित महिलेचा मृत्यू
काल रात्री मलकापूर ता. कराड येथून क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सारी आजारामुळे दाखल झालेल्या 85 वर्षीय महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
कोविड संशियत म्हणून या महिलेचा नमुना उपचारादरम्यान घेतला असून तो पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
Previous Article‘जी-7′ संघटनेत दक्षिण कोरियाला सहभागी करण्यास जपानचा विरोध
Next Article उत्तराखंडात टोळधाडीची शक्यता; हाय अलर्ट जारी
Related Posts
Add A Comment