प्रतिनिधी / सातारा
शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला प्रति लिटर १० रुपये अनुदान मिळावे, गायीच्या दुधाला ३० रुपये दर मिळावा, आणि दूध पावडर भुकटीला प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे या साठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सातारा जिल्ह्यातून भाजप प्रणित शेतकऱ्यांनी पत्रे पाठवली.क्षेत्र माहुलीत पोस्टासमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र इंगळे, सातारा शहराध्यक्ष आणि नगरसेवक विकास गोसावी, सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, प्रवीण शहाणे, गणेश पालखे, जिल्हा कायदा आघाडी अध्यक्ष प्रशांत खामकर , सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सुधीर काकडे, युवा मोर्च्यांचे स्वप्नील बोराटे, माजी सरपंच अरुण माने, अमर जाधव, दीपक आढाव, आनंदराव पवार, सतीश वंजारी, सागर गोळे, बिपिन जाधव, अमोल माने, सुभाष जाधव, दीपक चव्हाण, प्रवीण आढाव, क्षेत्रमाहुलीतील शेतकरी उपस्थित होते.
विक्रम पावसकर म्हणाले, महाराष्ट्रातले तिघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही. प्रति हेक्टर अनुदान, कर्ज माफी या विषयी दिलेले आश्वासन राज्य सरकारने पाळलेले नाही. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान सुद्धा अजून पर्यंत मिळालेले नाही. वास्तविक पाहता कोरोनाच्या संकटात सुद्धा शेतकऱ्यांनी सर्वांना दूध पुरवठा केलेला आहे. त्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. याचसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी भाजपाने शेतकऱ्यांना दूध अनुदान मिळण्यासाठी दूध एल्गार आंदोलन सुरू केले आहे. २२ जुलै रोजी या बाबत शासनाशी पत्र व्यवहार केला होता. दि १ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शासनाचा निषेध करत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. तरीही महाराष्ट्र शासनास जाग आली नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून कमीतकमी ५ लाख पत्रे मुख्यमंत्री मोहोदयांना पाठवून शासनाला हलवून जागे करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
Related Posts
Add A Comment