विशाल कदम / सातारा :
आपण भारी, आपला नेता भारी.. आपले कामच भारी, साताऱ्याच्या पाणी पुरवठा सभापती सीता राम हादगे यांचे कामच भारी.
पाणी म्हणजेच जीवन, हेची एक सत्य जाण,
साऱ्या जीवांचा आधार.. हेच एक प्रमाण मान…
या कवितेतील ओळीप्रमाणे सातारा पालिकेच्या पाणी पुरवठा सभापती सीता राम हादगे यांचे कार्य आहे. आघाडीचे नेते खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी जी जबाबदारी दिली, ही जबाबदारी संधी समजून सभापती सौ. सीता राम हादगे यांनी काम केले. पहिल्या दिवसापासून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी केवळ खुर्चीत केवळ सूचना न देता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जावून पाण्याची समस्या सोडवली आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकांना मुबलक आणि स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या सभापतींमध्ये पाणी पुरवठा सभापती सीता राम हादगे यांचे कामच परफेक्ट असे आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी पाणी पुरवठा सभापतीपदांसाठी सीता हादगे याच सक्षम आहेत हे ओळखले अन् त्यांच्यावर सभापतीपदाची धुरा दि. 11 जानेवारी 2021 रोजी सोपवली. जबाबदारी ज्यादिवशी दिली त्याचदिवशी सातारकरांना पाण्याची चणचण भासणार नाही. कुठेही समस्या निर्माण होणार नाही. यासाठी त्यांनी पायाला भिंगरी लावून कामाला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी त्यांनी आपल्या कामांतून चुणूक दाखवून दिली. त्यांच्याकडे पदभार आला त्याचदिवशी रविवार पेठेतील वाहतूक पोलीस कार्यालय ते पोवई नाक्यावरील आयडीबीआय बँक परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची समस्या होती. ती सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जावून त्यांनी ज्या पद्धतीने सूचना दिल्या. त्यानुसार कार्यवाही केल्यानंतर ही समस्या सोडविण्यात यश आले. रात्रीचा दिवस करुन त्यांनी ही समस्या सोडवली अन् पाणी पुरवठय़ाची समस्या निकाली काढली. एकदा नेत्यांनी दिलेली जबाबदारी ती पूर्ण करण्यासाठी मागे हटायचे नाही. शहरातील प्रत्येक नागरिकांना मुबलक पाणी द्यायचेच या इराद्याने व त्या ध्येयाने त्या कामाला लागल्या.

पाणी पुरवठा विभागामध्ये शहराच्या संपूर्ण पाणी पुरवठा योजनेचा त्यांनी अभ्यास केला. शहराला किती दररोज पाणी पुरवठा होतो. शहरातील लोकसंख्या काय?, किती टाक्या आहेत?, नळकरी किती आहेत, कोणती जलवाहिनी कोठून कशी गेली असा सर्व अभ्यास त्यांनी एक महिला असूनही पूर्ण केला अन् अवघड काम त्यांनी मागे न हटता स्वतः हाती घेतले अन् कामातूनच दाखवून देवू लागल्या. मग पावसाळय़ापूर्वी शहापुर योजनेचा सतत होणारा बिघाड कसा टाळता येईल यावरही त्यांनी तोडगा काढला. शहरातील गळत्या जेथे जेथे आहेत त्या सर्व गळत्या कशा काढल्या जातील आणि पाण्याचा होणारा अपव्यय टाळता येईल. पाणी वाचवता येईल असेही काम त्यांनी केले. काम करणाऱयांना फक्त कामच दिसत असते. सातारकरांच्या सेवेसाठी अगदी गोपाळ औताडे यांच्याप्रमाणे त्या काम करत आहेत. त्यामुळे कास पाईपलाईनपासून ते शहापूर उपसा सिंचन योजना व संगममाहुली या तिन्ही योजनांतून कधीही अडचण भेडसावणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली. त्यामुळे त्या आतापर्यंतच्या पाणी पुरवठा सभापतीमध्ये ग्रेट ठरल्या आहेत.
वॉर्डाबरोबरच शहरातील नागरिकांनाही प्राधान्य
प्रभाग 1 मधील प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. पाणी पुरवठा सभापती या नात्याने त्यांनी केवळ शहरातील प्रत्येक वॉर्डातल्या नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिल्या आहेत. जो कोणी पाण्याची समस्या घेवून पाणी पुरवठा विभागात गेला त्याची समस्या ऐकून घेवून ती सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यामुळे पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांचे कामच भारी असेच प्रत्येकजण सांगतो. त्यांनी इतर समस्यांच्या अनुषंगाने वनविभाग, महावितरणच्या कार्यालयाकडे निवेदन देवून सातत्याने पाठपुरावा केला.