प्रतिनिधी / सरवडे
सुळंबी ता.राधानगरी येथील तानुबाई दादू बरगे (वय १०४) या वृध्द आजीबाई कोरोनावर यशस्वी मात करून सुखरूपपणे घरी परतल्या. या आजींचा नातू जीएसटी अधिकारी सुशिलकुमार बरगे यांना प्रथम कोरोनाची लागण झाली, त्यानंतर त्यांची पत्नी नायब तहसिलदार रुपाली बरगे, भाऊ मुख्याध्यापक किशोर बरगे, भावजय सरपंच सुवर्णा बरगे, वडील निवृत्त केंद्रप्रमुख विठ्ठल बरगे, आई सुनिता बरगे, पुतणी प्रांजल बरगे यांच्यासह आजीचीही टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली.
यामधील काहीजण केपीसी हॉस्पिटल कोल्हापूर येथे उपचार घेत होते. तर आजीसह मुलगा व सुन यांच्यावर संत बाळूमामा यात्री निवास कोविड सेंटरमध्ये गेले आठ दिवस डॉ. बी.डी.डवरी, डॉ.विनायक कामत यांच्या नेतृत्वाखालील टीमने उपचार करून १०४ वर्षाचा आजीसह संपूर्ण कुटुंबाला कोरोनामुक्त केले. याबद्दल ग्रामस्थांवतीने आजीचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले.
Previous Articleतासगावात 47 जणांना कोरोनाची बाधा.
Next Article सांगली जिल्हय़ात 42 जणांचे मृत्यू,तर नवे 847 रूग्ण
Related Posts
Add A Comment