कोरोना रुग्णसंख्येतील घट दिलासादायक बाब : कोरोनामुळे तरुणांच्या उत्साहावर मर्यादा
प्रतिनिधी / बेळगाव
नववर्षाच्या स्वागतासाठी बेळगावकर सज्ज झाले आहेत. मात्र दरवषीपेक्षा भव्य प्रमाणात जल्लोषात हे वर्ष साजरे करता येणार नसून कोरोनाच्या नियमावलींचे पालन करूनच नववर्षाचे स्वागत करणे आवश्यक ठरणार आहे. अजूनही कोरोना पूर्णत: हद्दपार झालेला नाही. कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे, ही नववर्षाचे स्वागत करताना मोठी दिलासादायक बाब आहे. परंतु नियमांचे पालन अद्यापही आवश्यक आहे. मुख्य म्हणजे जिल्हा प्रशासनाने नववर्षाच्या स्वागताबाबत काही नियम घालून दिले आहेत. शिवाय गर्दी टाळण्यासाठी निर्बंधही लादले आहेत. दरवषी नवीन वर्षाचे स्वागत करताना ओल्डमॅनचे दहन करण्याची प्रथा आहे. कॅम्पमध्ये तर उंच उंच ओल्ड मॅन करण्याची आजवरची प्रथा आहे. परंतु यावषी कॅम्पमधील तरुणाईसह शहरातील अनेक तरुणांच्या उत्साहावर कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. दरवषी विविध ग्रुप, महिला मंडळे यांच्यामध्ये थर्टीफर्स्टचे बेत ठरतात आणि बहुसंख्य मंडळी एकत्रित बाहेर जाणे, पार्टीचे आयोजन करणे किंवा हॉटेलमधील पाटर्य़ांना उपस्थित राहणे यासाठी उत्साही असत. यंदा मात्र हे सर्व बेत पूर्णत: रद्द झाले नसले तरी त्यावर मर्यादा आल्या आहेत. याचे कारण म्हणजे प्रशासनाने पाटर्य़ा आणि मोठय़ा कार्यक्रमांना परवानगी दिली नाही. शिवाय 65 वर्षांहून अधिक वय असणारे ज्ये÷ नागरिक आणि 10 वर्षांहून कमी वय असणारी मुले यांना घरीच थांबण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. या दोन्ही गटांमुळे पालकांना घरीच थांबणे अपरिहार्य झाले आहे. प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, सामाजिक अंतराचे काटेकोर पालन करावे, मास्क वापरणे आवश्यक आहे. जेथे नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त पाटर्य़ा होणार आहेत अशी हॉटेल्स, मॉल, रेस्टॉरंट येथे थर्मल स्क्रिनिंग केले जावे, अशी नियमावली करून दिली आहे. याचे पालन काटेकोरपणे होण्यासाठी पोलिसांना दक्ष राहावे लागणार आहे. सरकार किंवा प्रशासनाने नियमावली ठरवून दिली तरीही समाजाने प्रामुख्याने तरुणाईने नियमांचे पालन होईल याचे भान बाळगणे आवश्यक आहे. सध्या लग्न सराईमध्ये तरुणाई जल्लोषामध्ये नृत्य करताना कोणत्याही नियमांचे पालन करत नाही हे स्पष्ट झाले आहे. नृत्यात धुंद तरुणाई ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. परंतु फक्त आपल्या आरोग्यासाठी नव्हे तर दुसऱयाच्या काळजीपोटी नियमांचे पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.