देशातील 75 वर्षांवरील नागरिकांना निवृत्ती वेतनामधून (पेन्शन) मिळणाऱया उत्पन्नावर रिटर्नपासून मुक्ती मिळणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात जेष्ठाना नमन करताना मी त्यांच्यासाठी नवी तरतूद केली आहे. असे उद्गार निर्मला सीतारामन यांनी काढले. त्यांना पेन्शनमधून मिळणाऱया उत्पन्नावर रिटर्न न भरण्याचा मी प्रस्ताव मांडत आहे, असे त्यांनी जाहीर केले. त्याचबरोबर कर थकबाकीदारांसाठी पुन्हा रिटर्न भरण्यासाठी 6 वर्षे जुन्या आणि गंभीर प्रकरणांमध्ये 10 वर्षे जुनी खातेवही काढावी लागते. या कालावधीच्या मर्यादेत बदल करुन ती सहा वर्षांवरुन तीन वर्षे करण्यात आली आहे. गंभीर प्रकरणांध्ये 50 लाखांपेक्षा अधिकची करचोरी झालेली असल्यास मात्र ही मर्यादा दहा वर्षे इतकी ठेवली जाणार आहे, असेही यावेळी अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.
Previous Articleदारू-जुगार-गांजा-गुटखा धाडीत साडेसतरा लाखांचा मुद्देमाल जप्त
Next Article आत्मनिर्भर अर्थसंकल्प
Related Posts
Add A Comment