प्रेमापासून भांडण देखील राहतात आठवणीत
वैज्ञानिक करत आहेत मेंदूवर संशोधन
आम्ही काहीच विसरू शकलो नसतो अशी स्मरणशक्ती मिळण्याची इच्छा प्रत्येकजण व्यक्त कर असतो. कितीही जुनी गोष्ट असली तरीही पटकन आठवावे असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु निसर्गाने आम्हाला दिलेली स्मरणशक्ती अपडेट होत राहते आणि अनेकार्थाने असे होणे आवश्यक देखील असते. परंतु एक अशी महिला आहे, जिच्या मेंदूतून आठवणीच संपत नाहीत.
या महिलेची स्मरणशक्ती तीव्र असल्याने हे घडत असून तिला एक वेगळय़ा प्रकारचा आजार आहे. या आजारामुळे तिला काहीच विसरता येत नाही. आम्हाला ज्या आठवणी धूसर स्वरुपात आठवतात, त्या तिला तंतोतत आठवत असतात. या महिलेचे नाव जिल प्राइस असून तिला हे वरदान ठरलेले नाही, उलट या स्मरणशक्तीमुळे ती त्रस्त असते.
14 वर्षांपासून काहीच विसरलेली नाही
जिल प्राइस यांच्यानुसार ती सर्व गोष्टी पूर्णपणे आठवू शकते. 2000 सालापासून तिचा मेंदू वैज्ञानिकांसाठी संशोधनाचा विषय ठरला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया-इर्वाइनचे संशोधक तिच्यावर अध्ययन करत आहेत. महिलेची स्मरणशक्ती तल्लख असण्यामागे एक विशेष स्थिती आहे. या विशेष स्थितीला हायपरथिमेसिया सिंड्रोम म्हटले जाते. या सिंड्रोमला हाइली सुपीरियल ऑटोबायोग्राफिकल मेमरी देखील म्हटले जाते. हा सिंड्रोम रुग्णाला स्वतःच्या जीवनातील सर्व अनुभव आठवणीत ठेवण्याचे वैशिष्टय़ मिळवून देतो.
जगभरात केवळ 60 जणांना सिंड्रोम
जिल प्राइस हा आजार असलेल्या एकमेव व्यक्ती नाहीत. जगभरात एकूण 60 लोकांमध्ये हा सिंड्रोम आढळून आला आहे. वयाच्या 14 व्या वर्षापासूनच्या सर्व गोष्टी मला आठवतात. क्षुल्लक घटनांच्या तारखाही आठवणीत आहेत, तसेच प्रत्येक घटनेचे दृश्य मी आठवू शकते. मेंदूवर अधिक ताण पडू नये म्हणून मी आता आठवणी लिहून काढते. याच्याशी संबंधित एक पुस्तक ‘द वुमन हू कान्ट फरगेट’ लिहिले असल्याचे जिल यानी सांगितले आहे.
