परदेशातील शिक्षणासाठी मदनदादांनी दिल्या शुभेच्छा
प्रतिनिधी/ वाई
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी
व कार्यालयीन कर्मचारी श्री. प्रमोद डेरे यांची कन्या कु. ऐश्वर्या डेरे हिने याच कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पदवीचे शिक्षण पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला विद्यापीठातून बी. टेक, ?ग्री ही पदवी पाच सुवर्ण पदके प्राप्त करून पूर्ण केली. तदनंतर पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाणा येथे एम.बी.ए. ?ग्री बिजनेस मॅनेजमेंट मध्ये प्रथम श्रेणी प्राप्त करून आपले शिक्षण पूर्ण केले.
सद्यस्थितीत इंग्लंड येथील द युनिव्हर्सिटी ऑफ वार्विक मध्ये एम.एस्सी. एक वर्षीय बिझनेस ?नॅलिटिक्स या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे. जगभरातल्या विद्यार्थ्यांमधून या विद्यापीठात प्रवेश मिळण्यासाठी लाखो विद्यार्थी अर्ज करतात. उच्च शिक्षणासाठी तीला प्रवेश मिळवल्याबद्दल जनता शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांनी सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव मा. जयवंत चौधरी, खजिनदार मा. नारायण चौधरी, संचालक केशवराव पाडळे, सुरेश यादव, मिलिंद जाधव-पाटील,
प्रा. वसंतराव जगताप, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, नंदकुमार भोसले यांची उपस्थिती होती.