प्रतिनिधी/ बेळगाव
स्वर्गीय पंडित भगवंतराव उर्फ बाळासाहेब कुलकर्णी-बेडकीहाळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रविवार दि. 12 मार्च रोजी संगीत संमेलन लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे.
सकाळी 10.30 वाजता दुसऱ्या सत्रात पुण्याचे सोनिक वेलिंगकर यांचे बासरीवादन होणार आहे. त्यांना पुण्याचे श्रीकांत भावे तबलासाथ करणार आहेत. त्यानंतर पुण्याचे अमोल निसळ यांचे गायन होणार आहे.
सायंकाळी 5.30 वाजता सुरू होणाऱ्या अखेरच्या सत्रात प्रथम आकाश पंडित यांचे गायन होणार आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध लेखिका, अनुवादकार आणि पं. बाळासाहेबांच्या कन्या उमा कुलकर्णी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देतील. या सत्रात पं. राजेंद्र कुलकर्णी यांचे बासरीवादन होणार आहे. त्यांना गोव्याचे उदय कुलकर्णी तबलासाथ करणार आहेत. कार्यक्रम सर्वांना खुला असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.